Warli Painting

India's global art, proudly tribal art

Warli Painting Design Sadee Booking

Warli Painting Design Sadee Booking
Warli Painting Design Sadee Booking

Adivasi Motive Key Chain Booking

Adivasi Motive Key Chain Booking
Click hre for details
Posted by AYUSH | Adivasi Yuva Shakti» on - - 0 comments»

लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाला.

ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा आहे. डहाणू तालुक्यात गंजाड गावातल्या कलमी या आदिवासी पाड्यात १३ मार्च, १९३१ रोजी जिव्या सोमा मशे यांचा जन्म झाला. रुढी-परंपरांचा पगडा असलेल्या आणि प्रचंड मागासलेल्या आदिवासी समाजात ते वाढले. मात्र, त्याच आदिवासींच्या वारली परंपरेने मशे यांचे आयुष्य पालटले. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यावरील बायका लग्नसमारंभात आपल्या घराच्या भिंतींवर वारली चित्रं काढायच्या.

तारप्याभोवती फेर धरून होणारा नाच, लग्नाचा मांडव, लग्नाचा चौक अशा असंख्य चित्रांचे मशे यांना लहानपणापासूनच आकर्षण वाटायचे. त्यामुळेच वारली चित्रं फक्त सुवासिनींनीच काढायची ही आदिवासींची प्रथा वयाच्या १३व्या वषीर् मशे यांनी मोडली. त्यानंतर वारली चित्रकलेच्या दुनियेत मशे यांनी सुरू केलेली मुशाफिरी गेली ६६ वषेर् अव्याहतपणे सुरू आहे. भारतातील आदिवासी कला जगासमोर याव्यात आणि त्यांच्या कलात्मक वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात एक शोध मोहीम राबविली होती. त्या मोहिमेतील भास्कर कुलकर्णी यांना जिव्या सोमा मशे हा अस्सल हिरा सापडला आणि मशे यांच्यासह वारली चित्र संस्कृतीचेही नशीब पालटले.

मशे आपली कला सादर करण्यासाठी दिल्लीत पोहचले. पारंपरिक वारली चित्रांच्या सोबत त्यांनी प्राणी, पक्षी, फुलांनाही वारली चित्रकलेच्या साच्यात मोठ्या खुबीने बसविले. या कलेने प्रभावित झाल्यानंतर मशे यांचा १९७६ साली राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान झाला. त्यानंतर देशातल्या अनेक कला दालनांमध्ये मशे यांच्या चित्रांची प्रदर्शने भरू लागली. राज्य सरकारच्या मदतीने वारली चित्रकलेच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक वर्कशॉप घेतली. आपल्या परिसरातील शेकडो अदिवासी मुलांना वारली कला शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. मशेंची दोन मुलेही या कलेत पारंगत असून त्यापैकी एक मुलगा वर्षातले तीन महिने जपानच्या म्युझियममध्येच कार्यरत असतो.

रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांनी मशे यांना आपली कलाकुसर दाखविण्यासाठी निमंत्रित केले. बेल्जियमच्या राणीने म्हशे यांना १७ लाख रुपयांची बक्षिसी दिली. जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्ते गौरव झाला. परदेशात असंख्य मानसन्मान मिळत असताना भारत सरकारने मात्र त्यांची भलतीच उपेक्षा केली आहे. १९७६ साली तत्कालीन राष्ट्रपती फक्रूद्दिन अली यांनी मशे यांना साडे तीन एकरची जमीन पुरस्कार स्वरुपात देण्याची घोषणा केली होती. मात्र, ३४ वषेर् सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवल्यानंतरही ८० वर्षांच्या या जगद्विख्यात कलाकाराच्या पदरात ही जमीन पडलेली नाही.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7381300.cms

Warli Art|Tribal Art

Categories:

Adikala : Tribal Entrepreneurship Model

Adikala : Tribal Entrepreneurship Model
Tribal Employment Generation Venture

Buy Warli Painting Online

Warli Painting

Warli Painting Animation

Warli Painting @ Facebook

Warli Art is our Cultural intellectual

Warli Art is our Cultural intellectual
Submit registration form