-
-
--
by AYUSH | Adivasi Yuva Shakti»
।। आदिकला नोंदणी उपक्रम ।।
आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी "आर्थिक स्वावलंबन" हे खूप महत्वाचे आहे. गेली अनेक वर्ष आपण आयुश तर्फे रोजगार्निमिती साठी विविध प्रायोगिक प्रयत्न करीत आहोत, हे उपक्रम व्यापक स्वरूपात नेण्यासाठी कलाकार, समाज, बेरोजगार युवक, शासन, खाजगी कंपनी (सी एस आर), इत्यादींडून एकत्रित प्लॅटफॉर्म बांधणी सुरु आहे.
आयुश चा वाढता संपर्क व कार्य, त्यातून कलाकरांना त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा, आदिवासी कला संस्कृतिचा प्रचार-प्रसार, स्थानिक रोजगार निर्मिती यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
वयक्तीक जबाबदारी आणि इत्तर प्राथमिकता या मुळे बहुतेकांना सामाजिक उपक्रमात सहभाग घेणे शक्य होत नाही, हे लक्षात घेऊन आपण एक अभिनव उपक्रम सुरु करत आहोत. जेणेकरून समाजात असलेले तज्ञ, अनुभवी, एक्स्पर्ट या समाज हिताच्या उपक्रमात सवडीनुसार सहभागी होऊ शकतील. पुढीलप्रमाणे दायित्व घेऊन या उपक्रमात सहभाग घेऊ शकता
१) कलाकार : चित्र, भेट वस्तू, शोभेचे सामान, घरोपयोगी सामान इत्यादी बनवता येणारे किंवा या क्षेत्रात शिकण्याची इच्छा असणारे
२) कलाकार गट / बचत गट / इत्यादी : एकत्रित काम करणारे गट
३) समन्वयक : उपक्रम, संपर्क आणि व्यवस्थापकीय दायित्व
४) प्रशिक्षक : कलाकरांना उपयोगी ठराविक विषयावर प्रशिक्षण देणे
५) मार्गदर्शक : कलाकारांना ठराविक विषयावर मार्गदर्शन करणे
६) स्वयंसेवक : उपक्रम यशस्वी करण्यासाठी जबादारी पार पाडणे
७) माहिती पुरवठा : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांना लागणारी पूरक आणि उपयोगी माहिती पाठवणे
८) प्रचारक/प्रसारक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांविषयी प्रचार व प्रसार करणे
९) हितचिंतक : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता सहयोग देणे
१०) सहयोगी : उपक्रमासाठी आर्थिक/वस्तू/सेवा स्वरूपात सहयोग
११) इत्तर : उपक्रमांसाठी वयक्तीक/एकत्रित माध्यमातून सहकार्य करणे
सहभागी होण्यासाठी त्वरित या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा.
नोंदणी अर्ज लिंक : https://goo.gl/forms/HxmFWURxpfqln3ro1
विखुरलेले पोटेंशियल रचनात्मक आणि सकारात्मक आदिवासी सशक्तीकरणासाठी कमी यावे हि अपेक्षा. जल जंगल जमीन जीव पर्यावरण जतन करण्यासाठी आपली स्वावलंबी अर्थव्यवस्था महत्वाची भूमिका पार पाडेल अशी खात्री आहे.
आपल्या संपर्कात सगळ्यांना या बद्दल कळवावे, आपल्या गावात पण या संदर्भात माहिती देऊन सहभाग वाढवण्यास हातभार लावावा.
आयुश । आदिवासी युवा शक्ती
[आदिकला उपक्रम] www.adiyuva.in